यावल । विहीरीत तोल जावून पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना यावल शहरात घडली.नितिन लक्ष्मण निंबाळे (वय-४५) असं या शिक्षकाचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील बालाजी सिटीया परिसरात राहणारे व वाघझीरा तालुका यावल येथील आदीवासी आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्य करणारे नितिन लक्ष्मण निंबाळे हे २४ जुलै रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी गेले.
या परिसरातील बालाजी मंदीरा, जवळ असलेल्या कोरड्या विहीरीच्या ओठ्यावर बसले असतांना अचानक त्यांचा तोल जावुन विहीरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मिलींद दिलीप मिस्त्री यांनी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयत शिक्षक नितिन निंबाळे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
Discussion about this post