यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुकमध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयावरुन ५० मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. व आता ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर जुन्या मीटर च्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्रामीण भागात ही कारवाई सुरू करण्यात आली.
शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यानुसार महावितरणचे पथक यावल तालुक्यातील सांगवी बु- या गावात गेले होते. यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे; असे संशयीत ५० मीटर तपासणीसाठी काढण्यात आले.
महावितरणने ताब्यात घेतलेल्या मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे. तर आता नागरिकांच्या घरात पूर्वीचे जुने मीटर एवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत. अशा संशयीत मीटर मधील तफावत व संबंधितांनी चोरी केलेलील असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. यात काही आढळून आल्यास वीज युनिट नुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post