यावल । ट्रॅक्टर चोरी गेल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना यावल पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी तब्बल 14 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी 37 दुचाकी व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
त्यांच्याकडून चोरीच्या 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, यावल शहरातील कुंभार टेकडी भागातून 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले. याप्रकरणी 18 सप्टेंबर रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत असताना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार (19, रा.कुंभारवाडा यावल) यास ताब्यात घेतले. त्याने ट्रॅक्टर चोरीत शहरातील चौघे सोबत असल्याचे सांगीतले. चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरसह दुचाकीदेखील चोरी केल्याची कबुली दिली. यात काहींचा सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर तब्बल 16 संशयितांचा टोळी समोर आली.
चौकशीत 16 संशयितांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल 37 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 13 दुचाकी विविध भागातून हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक मुजफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, असलम खान, हवालदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे, अशोक बाविस्कर, अनिल पाटील, एजाज गवळी या पथकाने केली.
Discussion about this post