देशात सर्व ठिकाणी युपीआय पेमेंट वापरलं जातयं. UPI मुळे आपल्या व्यवहाराच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पैसे पाठवणे असो किंवा दुकानात पेमेंट करणे असो, UPI ने सर्वकाही अतिशय सोपे आणि जलद केले आहे. काही सेकंदात QR स्कॅन करून, तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात (UPI ट्रान्सफर) आणि पेमेंट पूर्ण सुरक्षिततेसह केले जाते. मात्र, अनेकदा लोक चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवतात. त्यानंतर पैसे कसे परत मिळणार याची चिंता असते अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे सहज परत मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया
चुकीच्या युपीआयवर पैसे पाठवले तर काय करावे
जर समजा घाई गडबडीत तुमच्याकडून दुसऱ्याच व्यक्तीला युपीआयद्वारे पेमेंट केले गेले. तर लगेच बँकेच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरला संपर्क करावा. किंवा तुम्ही युपीआय सर्व्हिस देणाऱ्या कंपनीशीही संपर्क करू शकतात. टोल फ्री नंबर 18001201740 वर फोन करून तुम्ही चुकीच्या पेमेंटची तक्रार करू शकतात. आरबीआयने याविषयीच्या सुचना दिल्या आहेत. आरबीआयनुसार, पेमेंट सर्व्हिस देणाऱ्याला तुमचं पेमेंट चुकीच्या युपीआयवर झालं आहे, याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.
तुम्ही NPCI पोर्टलद्वारे ही तक्रार दाखल करू शकतात. पोर्टलवर जाऊन तुम्हाला What We Do या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. त्यापैकी UPI चा पर्याय निवडा. आता तक्रार विभागात जा आणि सर्व माहिती द्या. ज्यामध्ये तुम्हाला तुमची बँक नाव, UPI आयडी, फोन नंबर, ईमेल आयडी सारखी माहिती भरावी लागेल. तुमच्या तक्रारीच्या 30दिवसांनंतरही तुम्हाला पैसे परत मिळाले नाहीत, तर तुम्ही बँकेत तक्रार करून पैसे परत मिळवू शकता.
चुकीचा व्यवहार झाला तर लगेच बँकेला आणि युपीआय सेवा देणाऱ्या कंपनीला कळवावे. व्यवहार झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करणे बंधनकारक आहे. यानंतर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती नसते.
Discussion about this post