पुणे । आज महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून यांनतर दहावी परीक्षेचा निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे मात्र त्यापूर्वी १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बातमी असून आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
३०० रुपयांत प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये अभ्यासातील विषयांव्यतिरिक्त विविध विषयांच्या परीक्षा आणि स्पर्धा घेतल्या जात होत्या. शाळेत येणाऱ्या या संस्था ३०० रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र बनवून देत आहेत, असा आरोपही करण्यात आला होता. आरोप झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर आता या संस्थांची मान्यता रद्द झालीये.
कला, क्रीडा, सांस्कृतीत, लोककला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या आणि नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जात होती. त्यासह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना जास्तीचे मार्क देण्यात येत होते.
विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर देखील याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. आज बारावीचा निकाला जाहीर होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. अशात आता या निर्णयाने विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
Discussion about this post