जळगाव । जळगाव शहरामध्ये राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (वय-३१) असं मृत महिलेचं नाव असून आत्महत्यामागचं कारण समजू शकलं नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात सपना जगदीश भोई या महिला एकट्याच राहत होत्या. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी सपना भाई ह्या घरी एकट्या असतांना त्यांनी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांची बहिण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या.त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा ढलताच त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरविला. खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविदृयालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगरपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ हेमंत कळसकर करीत आहे.
Discussion about this post