मुंबई । ‘बिग बॉस ओटीटी’ फेम आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच आता पुन्हा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे, ज्यामध्ये पोलिस तिला ताब्यात घेताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमध्ये दिसत आहे. तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिस पोहोचल्या आणि त्यांनी उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं. पण हे काय आहे, अस का करताय, असा प्रश्न उर्फीने त्यांना विचारला. छोटे कपडे घातल्याचे कारण सांगत त्या महिला पोलिसांनी तिला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. मात्र ही माझी मर्जी आहे, मी मला पाहिजे ते कपडे घालू शकते असं सांगत उर्फी तिचा बचाव करताना दिसते.
तुला जे बोलायचं आहे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बोल, असं सांगत त्या दोन्ही महिला पोलिस तिला एका काळ्या कारमध्ये बसवतात आणि ते सर्व निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तिचा हा व्हिडीो पाहून उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.















Discussion about this post