महिला व बालविकास विभागामार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भारतीद्वारे एकूण १४ जागा भरल्या जाणार आहे. पुणे या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत अर्ज करायचे आहेत.
या नोकरीबाबत सविस्तर माहिती http://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित महिला व बालविकास अधिकाऱ्यांसाठी संपर्क साधा.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२५ आहे. यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाह. तुम्हाला अर्ज आयुक्त कार्यालय, महिल व बालविकास आयुक्तालय, २८-राणीची बाग, जुन्या सर्किट हाउसजवळ, महाराष्ट्र, पुणे-१ येथे पाठवायचा आहे. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
भारतीय नौदलात भरती
सध्या भारतीय नौदलातदेखील भरती सुरु आहे. भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.















Discussion about this post