जळगाव । घरकाम करत असताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी घडली असून मनीषा शामकांत बाविस्कर असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनीषा शामकांत बाविस्कर या पती, दोन मुले, सासू, सासरे यांच्यासह श्रीरत्न कॉलनीत राहत होती. एस.टी. वर्कशॉप येथे त्या काम करित होत्या. तर पती शामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रीपुरा येथे देशसेवा करीत आहे. दरम्यान शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी काम करीत असताना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.
कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णाल्यात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली.
दरम्यान मयत महिलेचा मृतदेह शबविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post