नवीन दिल्ली । ATM मशिनमधून मधून पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची गरज असते. मात्र, आता तुम्ही ATM विना कॅश काढू शकणार आहे. खरंतर देसभरात डिजिटल अर्थात यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने क्रांती आली आहे. आता पूर्वीसारखी खिशात रोख रक्कम घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलद्वारे सर्व पेमेंट करता येते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक विशेष सुविधा देऊ केली आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने देशभरातील सुमारे 6,000 एटीएमवर UPI एटीएम सुविधा सुरू केली आहे. बँकेने शुक्रवारी ही घोषणा केली. तुम्ही तुमच्या मोबाईलने UPI QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकता.
बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या समन्वयाने NCR कॉर्पोरेशनद्वारे संचालित UPI ATM लाँच करणारी ही देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
कोणत्याही बँकेचे ग्राहक पैसे काढू शकतील
बँकेने म्हटले आहे की त्यांचे आणि इतर बँकांचे ग्राहक UPI-इनेबल मोबाइल अॅपद्वारे त्यांचे डेबिट कार्ड न वापरता बँक ऑफ बडोदा UPI ATM मधून पैसे काढू शकतात.
निवेदनानुसार, UPI ATM इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) तंत्रज्ञानाद्वारे QR-आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा देते, यात रोख काढण्यासाठी कार्डची आवश्यकता नाही. UPI ATM सुविधेचा एक मोठा फायदा म्हणजे त्याद्वारे ग्राहक UPI शी लिंक असलेल्या विविध खात्यांमधून पैसे काढू शकतात.
Discussion about this post