मुंबई । राज्याच राजकारण पुन्हा ढवळून निघत आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून अशातच अजित पवार हे महाराष्ट्रातील मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर झळकले आहेत. त्यामुळे शिंदे गटात संभ्रमाचं वातावरण आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही, अचानक ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहेत. त्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना देखील घडली आहेत, या सर्व घटनांनी राज्य हादरवून गेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असे तर्क वितर्क लावले जात आहेत.
Discussion about this post