नवी दिल्ली । आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील सरकारने देशातील जनतेला काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसापूर्वीच सरकारने गॅस सिलिंडरचे दर १०० रुपयांनी कमी केले. यामुळे आता अनेक दिवसापासून स्थिर असलेले पेट्रोल डिझेलचे दरही कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला मात्र, यावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग यांनी स्पष्टीकरण दिलंय.
काय म्हणाले मंत्री हरदीप सिंग?
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय भू-राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिरतेवर अवलंबून आहे. बाहेरील जगातील परिस्थिती स्थिर होऊ द्या, तेलाच्या किमती स्थिर होऊ द्या, मग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती संदर्भात पाहता येईल असे मंत्री हरदीप सिंग म्हणाले.
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात कपात करून 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोनदा कमी केल्या आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. दोन्ही प्रसंगी कर कपात केल्यामुळे केंद्राला सुमारे 2.2 लाख कोटी रुपयांचे महसूल नुकसान सहन करावे लागल्याचे सिंग म्हणाले. उत्पादनात कपात करुनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या नाहीत.
कुठं दरवाढ तर कुठं स्वस्त
आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर जैसे थे स्थिर आहेत.
Discussion about this post