नवी दिल्ली : नवरात्रीपूर्वी सामान्यांना दिलासा मिळणार आहे. 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून आता 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब कायम आहेत. २२ सप्टेंबरपासून या GST बदलाची अंबलबजावणी होणार आहे. खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिकसह दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. दरम्यान, LPG गॅस देखील स्वस्त होणार आहे की नाही याबाबत अनेक गृहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आकारते. घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटी परिषदेकडून सिलेंडर दरावरील जीएसटी दरात बदल करण्यात आलेला नाही. अद्याप याबाबत कोणतीही माहिती नाही. २२ सप्टेंबर रोजी याबाबत माहिती समोर येईल.
या वस्तू होणार स्वस्त
3 सप्टेंबर रोजी झालेल्या GST काउन्सिलच्या निर्णयानुसार जीवनाश्यक वस्तू म्हणजे आरोग्यसेवा, शैक्षणिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विमा, ऑटोमोबाईल वस्तू जीएसटी दर कमी केले जाणार आहेत.
दरम्यान तंबाखू सारख्या उत्पादनांवरील जीएसटी 40 टक्के आहे. शीतपेयांवरील जीएसटी देखील 40 टक्के आहे. सुपर अलिशान कारवरील जीएसटी 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.















Discussion about this post