केंद्र सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देणार आहे. १.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. जुलै २०२५ मध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबरसाठीच्या महागाई भत्ता २ टक्क्यांवरुन ३ टक्के होई शकतो. याची घोषणा कदाचित जुलै महिन्यात होऊ शकतो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या जो महागाई भत्ता मिळत आहे तो जानेवारी २०२५ पासून लागू आहे. जर महागाई भत्त्यात वाढ झाली तर तो ५७ टक्क्यांवरुन ५८ टक्के करण्यात येईल.
महागाई भत्ता हा सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देतो. महागाईमुळे होणाऱ्या खर्च थोडाफार कमी व्हावा, यासाठी हे पैसे दिले जातात. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचे पैसे वाढवले जातात. जानेवारी ते जुलैच्या महागाई हप्त्याची घोषणा मार्चमध्ये होते. तर जुलै आणि डिसेंबरच्या महागाई भत्त्याची घोषणा नोव्हेंबर महिन्यात होते. यावर्षी ही घोषणा कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.
महागाई भत्ता किती वाढणार?
महागाई भत्ता हा CPI-IW द्वारे ठरवला जातो. हा इंडेक्स तुम्हाला किती रुपये महागाई भत्ता किती वाढ करावी लागणार याची माहिती देतो. यावेळी महागाई भत्त्यात एक टक्क्यांनी वाढ होऊ शकते. हा आकडा मे आणि जूनच्या PI-IW वर निर्भर असेल. त्यामुळे यावेळी महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो.
८वा वेतन आयोग कधी लागू होणार?
केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. १ जानेवारीपासून ८व्या वेतन आयोगाची शिफारसे लागू केली जाईल. परंतु या वेतन आयोगाबाबत घोषणा कधी होणार, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
Discussion about this post