नवी दिल्ली । भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा मोदी 3.0 मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरु आहे. यासाठी काही नावांवर चर्चा झाली आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षात लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले तरी महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. तसेच संघाचे मुख्यालय असलेले नागपूरमधील ते आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर संघाचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतात. पक्षावर त्यांची मजबूत पकड आहे. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.