पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार केला होता. त्या भ्याड हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट होती. पाकड्यांना जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीयांची होती. अखेर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत शेजाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. हे नाव देण्यामागचे कारण आता समोर आले आहे.
ऑपरेशन सिंदूर नाव का निवडलं?
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिले. सिंदूर हे नाव निवडण्यामागचे कारण आता समोर आले आहे. सिंदूर म्हणजे विवाहित स्त्रियांचे प्रतिक आहे. तसेच सिंदूर हे यौद्ध्यांसाठी गौरवाचे प्रतिक आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर या नावाने ही कारवाई केली आहे.
पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना मारले होते. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारले होते. त्यांनी गोळ्या झाडून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवालदेखील शहीद झाले. लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांतच विनय यांचे निधन झाले. या घटनेनंतर हिमांशीचे सौभाग्य तिच्याकडून हिरावून घेतले. यामुळे संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. त्यामुळे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडले.
Discussion about this post