मुंबई । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरूय. २० नोव्हेंबर ला एकाच टप्प्यात राज्यात निवडणुका पार पडणार आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? हे स्पष्ट झालं नाहीय. आता ऐन निवडणुकी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले.
राज्यात महायुतीचं सरकार आलं तर, मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावं समोर येऊ शकतात, असं विनोद तावडे म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेशात केलेला प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो, असंही ते म्हणाले. निकालानंतर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व यासंदर्भात निर्णय घेणार आहे, असेही तावडे म्हणाले.















Discussion about this post