धुळे : ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेविकेने १५ हजाराची लाच मागितली. हि रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रूक येथील तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण केले. तसेच गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले. या दोन्ही कामांच्या खर्चाचे बिल सादर करून देखील त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. यामुळे तक्रारदार यांनी एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेऊन केलेल्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदाराकडे बिल काढून देण्यासाठी २५ हजाराची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत विभाग कार्यालयाकडे यासंदर्भात ४ एप्रिलला तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी दरम्यान ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच (Bribe) स्वीकारण्याचे मान्य केले होते. दरम्यान १५ एप्रिलला सदरची रक्कम शिंदखेडा येथील राहते घरी स्वीकारताना ग्रामसेविका पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हि कारवाई धुळे लाचलुचपत विभागाने केली.















Discussion about this post