आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण, चांद्रयान 3 मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. हे लँडिंग पाहण्यासाठी अवघे भारतीय उत्सुक आहेत. दरम्यान, या अत्यंत ऐतिहासिक घटनेचं थेट प्रसारण असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटापासून हे प्रक्षेपण होणार आहे.
मिशन चांद्रयान-३ आज चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे. इस्रोचे अंतराळ यान यशस्वीरित्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणि आज लँडींगचा क्षण आलेला आहे. विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी होईल, असा दावा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
आतापर्यंत मिशन उत्तम प्रकारे सुरू आहे आणि सर्वांच्या नजरा सॉफ्ट लँडिंगवर आहेत. तो यशस्वी झाल्यास भारत हा पराक्रम करणारा चौथा देश ठरेल. आतापर्यंत अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि रशियाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे. त्याच वेळी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा जगातील एकमेव देश बनेल. देशाच्या अंतराळ संशोधनातील हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
लँडिग कसं कसं होणार? मॉड्यूल काय?
पहिला टप्पा – या टप्प्यात यानाची लेव्हलपासून 30 किलोमीटरचे अंतर कमी करून 7.5 किलोमीटरपर्यंत आणले जाईल.
दुसरा टप्पा – चंद्राच्या पृष्ठभागापासून ते चांद्रयानाचं अंतर 6.8 मीटर पर्यंतचं असेल. या टप्प्यापर्यंत यानाचा वेग 350 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे सुरुवात साडेचार पट कमी असेल.
तिसरा टप्पा – यात यानाला चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 मीटर उंचीवर नेलं जाईल. इथे दोन थ्रस्टर इंजिन उतरवले जातील. या टप्प्यात यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या जवळ नेला जाईल.
चौथा टप्पा – या टप्प्यात यानाला पृष्ठभागाच्या 150 मीटरपर्यंत आणलं जाणार आहे. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात. म्हणजे उभी लँडिंग होईल.
पाचवा टप्पा – या टप्प्यात यानाला लागलेल्या सेंसर आणि कॅमेऱ्यातून मिळणारे लाइव्ह इनपूट आधी स्टोअर केलेल्या रेफरन्स डेटाशी जुळवले जातील. या डेटामध्ये 3900 फोटो आहेत. हे फोटो चांद्रयान 3 उतरण्याच्या ठिकाणाचे आहेत. या फोटोवरून यानाला थेट चंद्रावर कुठे उतरवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे. यान उतरवण्याची जागा योग्य वाटली नाही तर यान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवलं जाईल. या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभूमीच्या 60 मीटरपर्यंत जवळ नेलं जाईल.
सहावा टप्पा – हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात लँडरला थेट चंद्रावर उतरवलं जाणार आहे.
थेट प्रसारण होणार?
या अत्यंत ऐतिहासिक घटनेचं थेट प्रसारण आज होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटापासून हे प्रक्षेपण होणार आहे.
लाइव्ह कुठे पाहाल?
सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रसारण इसरोची वेबसाईटवर पाहता येईल. याशिवाय इसरोचं युट्यूब चॅनल, फेसबुक पेजवरही पाहता येईल.
Please click the link to know more:
https://www.isro.gov.in/Chandrayaan3SoftLandingMessage.html
Discussion about this post