मुंबई । ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला. आता मात्र राज्यातून लवकरच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधून पुढील 24 तासात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय .मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौल या मार्गांमधून जात आहे. म्हणजेच राज्यातील विविध भागातून हळूहळू मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील पाच दिवस हवामान कसे ?
पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातून मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आलेले नाहीत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे.















Discussion about this post