नवी दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरियाणात 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आज निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील देखील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता होती. मात्र महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
“महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुका यापूर्वी एकत्र झाल्या होत्या. यापूर्वी 3 निवडणुका एकत्र होत होत्या यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुकासोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात,” असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने दिले मोठे संकेत!
तसेच सुरक्षा पुरवण्याचा कारणावरून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुकासोबत घेतल्या नाहीत, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, असे संकेत मिळत आहेत.
Discussion about this post