मुंबई । सध्या देशातील अनेक भागात उष्णतेची लाट पसरली असून यामुळे नागरिक अक्षरक्ष: होरपळून निघत आहे. यानंतर आता देशातील बहुतांश राज्यांना केवळ मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी समोर आलीय. यावेळी मान्सून वेळेआधी पुढे सरकत आहे आणि चांगला पाऊस पाडणार आहे. तेव्हा तुमच्या राज्यात मान्सून कधी दाखल होईल ते जाणून घेऊयात
उष्णतेचा सामना करणाऱ्या भारताला अवघ्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. मान्सून (२०२४) काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. दरम्यान 19 मे ला मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
मान्सून कोणत्या राज्यात कधी पोहोचेल?
हवामान खात्यानुसार, पुडुचेरी, तामिळनाडू आणि केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा आणि गोव्याच्या काही भागात 5 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाचे आगमन होऊ शकते. मान्सून साधारणपणे 10 जून रोजी तेलंगणा, सिक्कीम आणि महाराष्ट्रात दाखल होतो. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 15 जून आहे. 20 जूनपर्यंत मान्सून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात धडकू शकतो. ते साधारणपणे २५ जूनपर्यंत लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या उर्वरित भागात पोहोचते.
साधारणपणे याच काळात मान्सून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पोहोचू शकतो. साधारणपणे ३० जूनपर्यंत मान्सून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागात पोहोचतो. याशिवाय, 5 जुलै रोजी ते सामान्यतः राजस्थानच्या उर्वरित भागात पोहोचते.
















Discussion about this post