पुणे | राज्यातील अनेक भागात जुलै महिन्यात मुसळधार पाउस झाला. मात्र, राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली आहे. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे. आज सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला नाही.
परंतु विदर्भातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे, याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केलाय.
6 Aug: पुढच्या ४,५ दिवसात राज्यात कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे नाहीत.
राज्यात येत्या 4,5 दिवस हलका ते मध्यम पाउस असेल. pic.twitter.com/Lq2nWG5Q5z— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 6, 2023
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.
Discussion about this post