नागपूर । कसिनो निरसन विधेयकावरून विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ज्यावेळी हा कायदा मंजूर झाला, तेव्हा सभागृहाची मानसिकता या राज्यामध्ये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने होती.मात्र राज्यात अनधिकृत कॅसिनो मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ऑनलाइन जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यावर नियंत्रण असणारा कोणताही कायदा नाही.
जळगावमध्ये ऑनलाईन गेममधून अनेकांची फसवणूक झाली. येथे अनेक अवेध धंदे सुरु आहेत. गृहमंत्री यांना 52 पत्रे लिहिली. कुणा कुणाला किती हप्ते दिले जातात याची माहिती दिली. पण, त्यांना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप खडसे यांनी केला.
आत्तापर्यंत आपल्याकडे ज्या तक्रारी येतात त्याचा काही नोंदी आहेत का? देवेंद्र फडणवीस म्हणजे सज्जन आणि सुसंस्कृत नेता आहे असं म्हणतात. मी त्यांना अपयशी गृहमंत्री मानतो. जर तुम्ही कार्यक्षम असाल तर जळगाव जिल्हयातील काही माहिती देतो. आमच्या इथे 35 वर्ष कट्टे बनवणारा कारखाना आहे. यावर तुम्ही कारवाई करणार आहेत. मी 1 वर्ष झाले आपल्याला पत्र दिली आहेत आपण कधी कारवाई करणार आहोत? असा प्रश्नही सभागृहात एकनाथ खडसेंनी उपस्थिती केला.
Discussion about this post