जळगाव । जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून बुधवारी रात्रीचे तापमान ९ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले होते. यंदाच्या हंगामातील ही सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आहे..
दोन्ही जिल्ह्यात उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. मध्यरात्रीनंतर आणि पहाटे हवेत प्रचंड गारवा जाणवत आहे. जळगावमध्ये सन २०१४ नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ९.४ अंश आणि २०१४ मध्ये ९.१ अंशाची नोंद झाली होती.
काल बुधवारी तापमान ९.१ अंश होते. यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून येणाऱ्या काळात थंडीची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यातच एवढ्या कडाक्याची थंडी पडत असताना, डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका अजून वाढण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.















Discussion about this post