उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी झाल्याची बातमी समोर आली आहे. ढगफुटीमुळे येथे अचानक नदीला पूर आला आणि हर्षिलजवळील धाराली शहराला धडकला. धारालीमधील पावसाळी नाल्याभोवती बांधलेली अनेक घरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
या अचानक आलेल्या पुरात सुमारे 15 घरे वाहून गेल्याचा अंदाज आहे. तर 10 जण बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे. लष्कर आणि पोलिसांच्या पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. एनडीआरएफची टीम भटवाडीहून धारलीकडे रवाना झाली आहे, तर ऋषिकेशहून इतर पथकेही मदत आणि बचावासाठी पाठवण्यात आली आहेत.
#WATCH | Cloudburst triggers flash floods in Uttarkashi, Uttarakhand; dramatic landslide visuals caught on camera. #Viral #Trending #Cloudburst #Uttarkashi pic.twitter.com/DwR6Iaad0d
— TIMES NOW (@TimesNow) August 5, 2025
एसडीआरएफचे आयजी अरुण मोहन जोशी यांनी सांगितले की, धारलीच्या सर्वात जवळील एसडीआरएफ टीम तिथे पोहोचली आहे आणि तिथे मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आरके सुधांशू यांनी सांगितले की, डीएम आणि एसपी दोघेही घटनास्थळी रवाना झाले आहेत. तिथे काही लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती आहे. आम्ही एसडीआरएफ आणि एनडीआरएफ टीम तिथे पाठवल्या आहेत.
Discussion about this post