खरगोन । मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात अचानक टायर फुटल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली नदीत कोसळली. या बसमधून २५ प्रवाशी प्रवास करीत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.अपघात झालेल्या बसच्या पाठीमागून येत असलेल्या वाहनाच्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे
बस क्रमांक एमपी 10 पी 8088 ही खरगोनहून सनावदकडे जात होती. रोडिया गावाजवळ बनी नदीच्या पुलावर या बसचे टायर फुटले आणि बस थेट नदीत कोसळली. या अपघातातील जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/Naman_matke/status/1707636786032460172
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी निघालेली बस खरगोन जिल्ह्यात थांबलेल्या ट्रकला धडकली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कासरवाड पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.















Discussion about this post