महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात सात आरोपींवर मकोका लावला गेला आहे, परंतु वाल्मिक कराड याच्यावरही मकोका लावण्याची मागणी केली जात आहे. यातच एक मोठी बातमी समोर आलीय. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे.
आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला आहे. आता यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीकडून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Discussion about this post