मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून यातच निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो. आता या विधानावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा सांधला..
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहे, असं शरद पवार म्हणालेत.
मोदींवरही निशाणा
मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरुंचे भाषण पुण्यात ऐकलं. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ४०० पारची. ४०० पार कशासाठी?, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका केली आहे.