जळगाव । भुसावळ, जळगाव मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमीचा आहे. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीची मागणी लक्षात घेऊन मदुराई आणि चेन्नई सेंट्रल येथून भगत की कोठी (राजस्थान) या दरम्यान दोन विशेष साप्ताहिक गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांना भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबा देण्यात आल्यामुळे जळगावकरांची सोय झाली आहे.
मदुराई – भगत की कोठी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ०६०६७ क्रमांकाची गाडी २१ एप्रिल रोजी १०.४५ वाजता मदुराई येथून सुटून २३ एप्रिलला १२.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. ०६०६८ क्रमांकाची गाडी २४ एप्रिलला ५३० वाजता भगत की कोठी येथून सुटुन २६ एप्रिलला ८.३० वाजता मदुराई येथे पोहोचेल.
ही गाडी दिंडीगूल, तिरुचेरापल्ली, वृद्धाचलम, विल्लुपुरम, चेन्नई एग्मोर, गुडूर, विजयवाडा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, साबरमती, मेहसाणा, पाटण, जालोर, समदरी, लुनी येथे थांबेल असेल.
तसेच चेन्नई सेंट्रल भगत की कोठी ही ०६०५७ क्रमांकाची गाडी २० एप्रिलला रात्री ७.४५ वाजता चेन्नई सेंट्रल येथून सुटून २२ एप्रिलला १२.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
०६०५८ गाडी २३ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता भगत की कोठी येथून सुटून २५ एप्रिलच्या रात्री ११.१५ वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचेल. भुसावळ व जळगाव येथे थांबा आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा. वैध तिकिट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Discussion about this post