अकोला । लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून अनेक उमेदवारही जाहीर केले आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत, असे विधान केले होते. आता त्यांच्या या विधानाचा समाचार प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.
काय म्हणले प्रकाश आंबेडकर?
“निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
‘मुंबईच्या जागा जाणीवपूर्वक जाहीर केल्या नाहीत’
मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.















Discussion about this post