राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे असा आरोप त्यांनी केला आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर देशद्रोह्याला पाठिशी घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो, असंही वडेट्टीवार म्हणाले.
नेमका काय आहे आरोप
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. ज्या गोळीने हेमंत करकरे शहीद झाले होते. ती गोळी कसाबची नव्हती. हे स्पष्ट आहे. मी मनाचं बोलत नाही. मी पुस्तकाचा दाखला देत आहे. हेमंत करकरेंना जी गोळी लागली ती अतिरेक्यांची नव्हती. एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी म्हटलं आहे.
हे चुकीचं नाहीये. त्यांच्या पुस्तकाच्या आधारावर मी हे म्हटलंय. यात जर 50 टक्के असत्य असेल तर 50 टक्के सत्य असेल ना? ती बाजू का मांडली नाही? मी मनाचं बोलत नाहीये. मुश्रीफ यांनी लिहिलंय. मांडलंय. मुश्रीफ यांनी पोलीस तपासाच्या आधारेच हे म्हटलं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post