जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू नागरिकांना मारल्याचं सांगितलं जात आहे. यातच ‘धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का?’, असं धक्कादायक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. या विधानानंतर वडेट्टीवार यांच्यावर सत्ताधारी जोरदार टीका करत आहेत. आता विजय वडेट्टीवार यांनी या विधानावर स्पष्टीकर देत सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
आपलं अपयश लपवण्यासाठी सरकारने माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवले.’, असं म्हणत वडेट्टीवार यांनी पहलगाव हल्ल्यावरील वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ‘नितेश राणे यांनी काय म्हटलं त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. काल मी जे बोललो ते तोडून मोडून दाखविण्यात आलं.
भारताला आपापसात लढविण्याचे षडयंत्र पाकिस्थानने रचले आहे. पहिल्यांदा दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी माझं वक्तव्य तोडा मोड करून दाखविले गेले. माझं वक्तव्य मागून पुढून न दाखविता तोडून मोडून दाखवण्यात आलं.’ वक्तव्याचा विपर्हास केला गेला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
‘देशांमध्ये कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला. आमची भूमिका स्पष्ट आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे. काल बोललो की अतिरेक्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला. त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. तेवढेच दाखविण्यात आले. माझं पूर्ण वक्तव्य दाखवा ही विनंती आहे.’, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असं मी बोललो. हा भारताला कमजोर करण्याचा हल्ला होता. असंही ते म्हणाले
Discussion about this post