REEL बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय मुलाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशचत्या बाराबंकीमध्ये समोर आली आहे.या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लाल शर्ट घातलेला एक मुलगा डोक्याला रुमाल बांधून रेल्वे ट्रॅकवर जात आहे. तेव्हा त्याच्या मागून एक ट्रेन येते. त्या ट्रेनच्या धडकेत हा मुलागा दूरवर फेकला जातो. संपूर्ण घटना मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे
विद्यार्थ्याला ट्रेनने धडक दिल्याची माहिती मिळताच जीआरपी आणि आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
tw // disturbing
Barabanki: A teenager Farmaan (14) who was purportedly making a video for Instagram reels along the railway tracks was kiIIed when he was struck by a running train. pic.twitter.com/Ysxl895ABD
— زماں (@Delhiite_) September 30, 2023
जहांगीराबाद शहरातील टेरा दौलतपूर गावात राहणारा १६ वर्षीय फरमान आपल्या ३ मित्रांसोबत फिरायला गेला होता. दरम्यान तो दामोदरपूर गावातील रेल्वे क्रॉसिंगजवळ रील बनवण्यासाठी गेला होता. त्याचा एक मित्र अप-लाइनवर उभा राहिला आणि व्हिडिओ शूट करत होता.
फरमानने त्याला स्लो मोशनमध्ये रील बनवण्यास सांगितले. दरम्यान दरभंगा एक्स्प्रेस डाऊन मार्गावर आली. रेल्वेच्या इंजिनला धडक बसल्याने फरमान रुळाच्या बाजूला पडला. मोबाईल सुरु असल्याने सगळी घटना त्यात रेकॉर्ड झाली आहे.
Discussion about this post