मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं २ फेब्रुवारी रोजी कॅन्सरने निधन झाले, असं वृत प्रसारमाध्यमांमधून धडकलं. यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. अनेकांनी पूनम पांडेला श्रद्धांजली देखील वाहिली. मात्र, आता पूनम पांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवा व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
तिने खुद्द सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे. माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही,” असं ती या व्हिडीओत म्हणाली. शुक्रवारी सकाळी पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती.
या पोस्टमध्ये तिच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला होता. सर्वाइकल कॅन्सरने पूनमचं गुरुवारी रात्री निधन झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या पोस्टने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली. अनेकांनी पूनमच्या निधनाबद्दल आणि सर्वाइकल कॅन्सरबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता पूनमचा व्हिडीओ समोर आला आहे.
“मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे की इतर सर्वाइकल कॅन्सर हे रोखू शकता येतं. हे कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखं नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही (HPV) व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये म्हणून आपण एवढं आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो,” असं पूनम या व्हिडीओत पुढे म्हणाली.
Discussion about this post