नवी दिल्ली । लोकसभेचं विशेष अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. या दरम्यान, भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी, एका विरोधी पक्षाच्या खासदाराला उद्देशून शिवराळ भाषा वापरली आहे. खासदार महोदयांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बुधरी एका धर्माला उद्देशून टिपणी करतानाही दिसत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. आपल्या पक्षाच्या खासदाराच्या या प्रतापामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे. दिवशी चांद्रयान – ३ मोहिमेच्या यशाबाबत दोन्ही बाजूचे खासदार अभिनंदन करत असताना हा प्रकार घडला आहे.
गजब ही घटिया भाषा का इस्तेमाल किया है बीजेपी सांसद रमेश भिदुड़ी ने। लोकतंत्र के मंदिर संसद का भी अपमान है ये। स्पीकर को तो तुरंत कार्रवाई करनी चाहिए। गजबे है 🙄
pic.twitter.com/uB6t3IgYzN— Sushant Sinha (@SushantBSinha) September 22, 2023
तत्पूर्वी, जुन्या संसद भवनाच्या इमारतीमध्ये सुरु झालेलं हे विशेष अधिवेशन मंगळवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं. नव्या संसद भवन इमारतीमध्ये कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षणाचे विधेयक मांडून चांगली सुरुवात करण्यात आली. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करण्यात आले आहे.
पुढील वर्षी देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच लोकसभेत शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला आहे. भाजप खासदाराने यावेळी एका विशिष्ट धर्माला उद्देशून टिपणी केल्याचं पाहायला मिळालं.
देशात राजकारणाची पातळी खालावली असल्याच्या चर्चा सुरु असतानाच, रमेश बिधुरी यांच्या आजच्या वक्तव्याने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. लोकसभेत हे चित्र पाहायला मिळत असेल तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये हे नेते आणखी किती खालचा स्तर गाठणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
Discussion about this post