जळगाव : विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् पावसाचा फटका बसला. विदर्भातील बुलढाणा शहर आणि जिल्ह्यात सोमवारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. गारांचा खच रस्ते आणि शेतात अनेक ठिकाणी दिसून येत होता. चिखली देऊळगावराजा रोड बर्फाने झाकल्या गेला होत्या. आता शेतातील गहू हरबरा काढणीला आला होता. त्याचे गारपीटमुळे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.
जळगाव जिल्ह्यास फटका
जळगाव तालुक्यात अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सडावण, दहीवद, नगाव, गळखांब, पातोंदा, सावखेडा या गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसेच अमळनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. पारोळा तालुक्यात भिलाली गाव तसेच इतर गावांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं गारपीट झाल्याची माहिती आहे. चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला.















Discussion about this post