अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचंड प्रयत्नांनंतरही ट्रम्प यांनी जीत मिळवली आहे, ज्यामुळे अमेरिकन राजकारणात नवीन वळण आले आहे.
राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान २७० मतांची आवश्यकता होती. या निवडणुकीच्या निकालामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७७ इलेक्टोरल मते मिळाली असून ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला आहे. तर कमला हॅरीस यांना २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्र्मप यांनी पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, पॉप्युलर व्होटमध्ये ट्रम्प यांचा विजय ऐतिहासिक आहे. कारण गेल्या २० वर्षांत रिपब्लिकन पक्षाचा कोणताही उमेदवार असे करू शकला नाही.