मुंबई । भारतीय संगीतविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला.
आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जात होते. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
चार वाजता होणार अंत्यसंस्कार
आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.














Discussion about this post