मुंबई । मुंबईतील वसईमधून एक भयंकर घटना समोर आलीय. जिथे पटांगणात खेळणाऱ्या ५ वर्षाच्या चिमुरड्याला कॅब चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरीही हा चिमुकला सुखरूप आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून याबाबत संबंधित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि वाहनचालकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वालीव येथील मोकळ्या जागेत एम.एच. ०१ ई एम ३२४५ या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन मागवली होती. कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला. मात्र तो मुलगा त्या कारच्या चालकाला दिसला नाही. तेवढ्यात त्या कारचालकाने कार बेदराकपणे चालवत मुलाच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला.
Accident: A six-year-old boy, playing in an industrial area in #Vasai, was critically injured after being accidentally run over by an aggregated cab on Wednesday.
Note: Ignore a few last seconds of the videohttps://t.co/R3QzQL9ZyI pic.twitter.com/HPAKkzdXWS
— Diwakar Sharma (@DiwakarSharmaa) December 25, 2024
तेथील लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला सुसाट निघून गेला. संबंधित मुलावर वसई पूर्वेकडील वालीव येथील वालवादेवी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.















Discussion about this post