जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. ११ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त पोवाडा गायन,रक्तदान शिबीर, समता दौड, मिरवणूक व व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती महोत्सवाचे आयोजन विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत बौध्द अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, महात्माफुले अध्ययन व सशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मागसवर्गीय कर्मचारी संघटना, फुले- शाहु-आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या विचारांचा जागर होवुन त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचवुन त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी शाहु, फुले-आंबेडकर शाहिरी जलसा हा पोवाडा गायनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये शाहीर शिवाजीराव पाटील आणि कलावंत सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. शनिवार दि. १२ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या दृकश्राव्य हॉल येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समता दौड आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकी नंतर सकाळी ११ वाजता वर्धा येथील नालंदा अकादमीचे संचालक डॉ.अनुप कुमार यांचे जागतिक उच्च शिक्षणातील संधी आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर सिनेट सभागृहात व्याख्यान होणार आहे
Discussion about this post