भुसावळ । तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात पिता आणि पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. संजय श्रावण साबळे (वय ४०, रा सिद्धेश्वर नगर, वरणगाव) व भूषण संजय साबळे (वय ७) असं मृत पिता-पुत्राचे नाव आहे. या घटनेत एक मजूर देखील गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक संजय साबळे हे त्यांच्या ट्रॅक्टरने किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर ‘कच’ आणण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा ७ वर्षांचा मुलगा भूषण आणि अक्षय संतोष मोरे (वय २४) हा मजूर देखील होता. प्रवास सुरू असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटला.
ट्रॅक्टरखाली दाबले गेल्याने चालक संजय साबळे आणि त्यांचा मुलगा भूषण या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रॅक्टरवरील मजूर अक्षय मोरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्यासोबत मुलाचाही मृत्यू झाल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आणि कुटुंबांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.















Discussion about this post