जळगाव : नाशिक सप्तशृंगी गडावरील घाटात झालेल्या एसटी बस अपघातात जखमी प्रवाश्यांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. या कक्षाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर नाशिक जिल्हा रूग्णालय व वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सप्तशृंग गड ते खामगांव ह्या बसचा आज, दि.१२ जुलै रोजी सकाळी सप्तशृंग घाटातील गणेश घाट, नांदुरी येथे ६.५० वाजता अपघात झाला. या अपघातात आशाबाई राजेंद्र पाटील (वय-55 रा.मुडी. ता.अमळनेर जि.जळगांव) यांचा मुत्यु झाला आहे.
यात जखमी मध्ये सर्व रा .मुडी. ता.अमळनेर, जि.जळगांव येथील आहेत. यात प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर वय.65 , संजय बळीराम भोईर, वय-60, सुशिलाबाई सोनु बडगुजर वय -67, वत्सलाबाई साहेबराव पाटील वय-65, सुशिलाबाई बबन नजान वय-65, विमलबाई भोई वय-59, प्रतिभा संजय भोई वय-45, जिजाबाई साहेबराव पाटील वय 65, संगिता बाबुलाल भोई वय-५६ रत्नाबाई (आडनाव सांगितले नाही) सुरेखाबाई हिरालाल बडगुजर वय-53, भागीबाई माधवराव पाटील वय-५२, संगिता मंगिलाल भोई वय-56 तसेच भोकर,ता.जि.जळगाव येथील रघुनाथ बळीराम पाटील वय-70, बाळू भावलाल पाटील वय-48 यांचा समावेश आहे.
जखमींवर प्रवाशांच्या मदतीसाठी अमळनेर येथे स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संदीप पाटील – 9834236436 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अमळनेर तहसीलदार रूपेश सुराणा यांनी केले आहे.
दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रूपये शासकीय मदत घोषित करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असल्याचे मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क कक्षाने प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातस्थळी यांनी भेट दिली असून मंत्री अनिल पाटील हेही अपघातग्रस्तांची नाशिक येथे भेट घेणार आहेत.