जळगाव । नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच सुरू होणार आहे. विशेष या वंदे भारत ट्रेनला भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आता रेल्वे मंत्रालयाने वंदे भारतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पण वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून धावणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा सुरू होती. आता या गाडीचे वेळापत्रक समोर आले आहे. केवळ सुरुवातीची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कसे असेल वेळापत्रक?
गाडी क्र. २६१०२ अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत सकाळी ९:५० वाजता अजनी स्थानकातून सुटेल. वर्धा स्थानकात १०:४० वाजता, बडनेरा १२:०३ वाजता, अकोला दुपारी १ वाजता, भुसावळ दुपारी २:५५ वाजता, जळगाव दुपारी ३:२६ वाजता, मनमाड ५:२५ वाजता, कोपरगाव सायंकाळी ६:२० वाजता, अहमदनगर ७:३५ वाजता दौंड ८:४३ व पुणे येथे रात्री ९:५० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात क्र. २६१०१ वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकातून सुटेल. जळगावला दुपारी १२:३५ वाजता, भुसावळ येथे दुपारी १:०५ वाजता तर अजनी स्थानकावर संध्याकाळी ६:२५ वाजता पोहोचणार आहे.















Discussion about this post