जळगाव | एकीकडे लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केली जातं असता जळगावच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आता अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
म्हणून उमेदवारी माघे घेतली..
दरम्यान, लोढा यांनी उमेदवारी का माघे घेतली याबाबत तर्कवितर्क लढविले जात असताना त्यांनी उमेदवारी माघे घेण्याचं कारणही सांगितलं. मतदारसंघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.“कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही. स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेतली”, असं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.
उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल प्रफुल्ल लोढा यांचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं झालं आहे. प्रफुल्ल लोढा आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आणि कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार आहेत.