मुंबई : महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. एकूण 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचितच्या पहिल्या यादीत एकूण 8 जागांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील उत्तर मध्य जागेवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मैदानात उतरवला आहे. उत्तर मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 48 लोकसभेच्या जागांपैकी 19 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वंचितने नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केलाय.
वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुर रहमान, हातकणंगले मतदारसंघातून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे, जालन्यातून प्रभाकर बाकळे, उत्तर मध्य मुंबईमधून अब्दुल खान आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Discussion about this post