मुंबई । महाविकास आघाडीमधून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतलाय. वंचित आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या एकला चलो रे भुमिकेचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत होणारे हे नुकसान पाहता काँग्रेस पक्षाकडून प्रकाश आंबेडकरांची मनधरणी केली जात असल्याचे बघायाला मिळत आहे.
काँग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असून, तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भुमिकेवर बोलतांना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की, “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिली आहे.
Discussion about this post