जळगाव | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूचा मुद्दा ऐरणीवर आला असून अशातच पाचोरा तहसील कार्यालयात जप्त केलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी काही ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले होते. संशयित आरोपी ऋषिकेश मुरलीधर येवले (रा. पाचोरा) याने तहसील आवारात जमा केलेले ट्रॅक्टर चोरून नेले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर येथील गस्तीवर असलेले गोपीचंद जगन्नाथ महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी ऋषिकेश येवले याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास खैरे करीत आहेत.
Discussion about this post