बीड । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची एसटीआय आणि सीआयडीकडून चौकशी सुरु असून याच दरम्यान सीआयडीच्या तपासातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
वाल्मीक कराडकडून ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील एक सिमकार्ड हे परदेशात रजिस्टर केलेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला असून आता त्या दिशेने सीआयडीने तपास सुरू केला आहे.
दरम्यान वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकीलाकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सीआयडीने या जामीन अर्जावर आक्षेप नोंदवला असून वाल्मीक कराडला जामीन मिळाला तर पुराव्यामध्ये छेडछाड होऊ शकतो? असा आक्षेप नोंदवत जामीन न देण्याची विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली आहे.
Discussion about this post