बीड | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून अशातच या प्रकरणातील सर्व आरोपींना एकत्र दर्शविणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहे. वाल्मिक कराड याचा केजमधील व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींसोबत दिसत आहे. या व्हिडीओमुळे कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पाय आणखी खोलात गेले आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडीओमध्ये वाल्मिक कराड दिसत आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे. त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा तपास सुरू आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय.
वाल्मिक कराड याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे. सध्या पोलीस कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या जामीनावर लवकरच सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच खंडणीच्या दिवशीचा व्हिडीओ समोर आलाय. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचं समोर आले होते. त्याबाबत दावे-प्रतिदावे होत होते. आवाजाचे नमुने घेतले जात होते. त्यातच आता हा व्हिडीओ महत्त्वाचा समजला जात आहे.
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असल्या वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचा नमुना CIDनं घेतलेला आहे. ज्या दिवशी खंडणी मागितली, त्या दिवशी दुपारी अकरा वाजता व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर हे आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड केजमध्ये होता, याचा हा पुरावा देखील आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील काही आरोपी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
Discussion about this post